Friday, February 6, 2009

(पोलीस कोठडीत असलेले श्री राजु आणि त्यांच्या सहकार्‍यानी नुकताच एक बेमौसमी भोंडल्याचा कार्यक्रम केला. त्यातलेच काही निवडक भोंडले ....).
ऐलमा पैलमा एनरॉन देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवामाझी लाज टांगली वेशीच्या दारी शरम बसलीये फाट्यावरी.घडव घडव रे 'राजु'कल्याताळेबंद घडव रे साजुकला.एक डाव वाचव रे ऑडीटरादेइन तुला सोन्याचा हारा.एक राजु आणु बाई दोन राजु आणुदोन राजु आणु बाई तीन राजु आणुतीन राजु आणु बाई चाए राजु आणुचार राजु आणु बाई पाच राजु आणुरामा लिंगमाचा शेणोठाडुबवी सत्यम मेटासा.छु बाई छु लब्बाडी फुलताळेबंदातून नफ्फाच गुल.रोखे विकतो भाव गळतोतेलगु लोफर झोल खेळतो.झीम पोरी झीम कप्पाळाच बिंगबिंग गेल फुटून राजु आला सुटुन.(चु भू द्या घ्या )

tula kaapate re tulaa kaapate

ग दि मा, राजाभाऊ आणि बाबुजींची क्षमा मागून 'तुला पाहते रे तुला पाहते' ह्या अजरामर गीतचे स्वैर विडंबन लिहीण्याचा प्रयत्न )
तुला कापते रे तुला कापतेतुझी पर्स माझ्या मनी राहतेजरी साधीभोळी तुला कापते
तुझ्या पगाराचा जीवा ध्यास लागेतुझ्या मिळकतीने मनी खर्च जागेतुझ्या कार्डने मी मॉल नाहते
किती भाग्य थोर ह्या साधेपणीहीदिसे वस्तू निद्रेत जागेपणीहीउगी का वाण्याचे बील वाढते
कधी बोका पाहतो का बडग्यालापती न्याहळी का कधी शेजारणीलालाटणे घेऊनी मी सदा राहते(चू भू द्या घ्या )